स्त्री

“स्त्री”

कोणतीही वाईट गोष्ट किंवा अन्याय हा हजारो वर्ष चालत आला की अक्षरशः रक्तात, पेशिपेशित आणि मानसिकतेत घुसतो. मग ती एक नैसर्गिक प्रक्रिया होत जाते. मग ते अन्याय आणि चुकीच्या गोष्टी देखील गोड आणि चांगल्या वाटत जातात.
ज्या स्त्रिया अजून स्वतःच्या पायावर उभ्या नाहीत किंवा शिकलेल्या नाहीत त्यांची गोष्ट सोडा पण आज ज्या करोडो स्त्रिया नोकरी करतात स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्यांचेच उदाहरण देतो.
1. अगदी सुरवातीच्या काळात कोणत्या मुलीला हे आवडले असेल की आपले नाव लग्नानंतर बदलले जावे? आपले आडनाव बदलले जावे? ज्या बाळाला आपण 9 महिने पोटात ठेवले त्याला फक्त बापाचे नाव लावले जावे?
हजारो वर्षांपूर्वी जेव्हा या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा किती प्रचंड त्रास झालं असेल. त्यात जबरदस्ती झाली असेल. पण अगदी 10 ते 20 वर्षांपूर्वी आणि अजून देखील ही गोष्ट इतक्या सहजपणे आणि इतक्या खुशीने आणि आनंदाने ही गोष्ट घेतली जाते. हल्ली बऱ्याच मुली लग्ना नंतर नाव बदलत नाहीत हा बदल होतोय. पण खूप कमी आहे. बऱ्याच मुली लग्ना नंतर माहेरचे आणि सासरचे दोन्ही आडनाव सोशल मीडिया वर लावतात. कोणता मुलगा किंवा पुरुष असे करताना दिसला का? आत्ता आत्ता प्रत्येक फॉर्म मध्ये आईचे नाव लिहायची सोय आली. पण हे देखील फक्त फॉर्मवर. 20 एक वर्ष आधी पर्यंत असे काहीही नवते. परंतु आज देखील कोणत्याही मुलाला नाव विचारले की स्वतःचे नाव मग बापाचे नाव आणि मग आडनाव असेच सांगितले जाते.
त्यामुळे आज काल शिकल्या सावरलेल्या मुली, स्वतःला स्वतःच्या पायावर उभ्या समजत असलेल्या मुली देखील वरील सांगितलेल्या गोष्टी सर्रास करतात.
किती अश्या मुली माहित आहेत ज्या नाव बदलत नाहीत? आडनाव देखील बदलत नाहीत? ज्या लग्न नंतर आपले पासपोर्ट किंवा अन्य कागदपत्रात नाव आडनाव तेच ठेवतात? हातावर मोजण्याइतकेच असतील.
2. कोणत्या माणसाला असे वाटेल की आपल्या पार्टनर ल आपल्या शिवाय अजून पण कोणी पार्टनर असावा?आपल्या नवऱ्याला आपल्याशिवाय 2 बायका असाव्यात?
पण कैक धर्मात असेच चालू होते. अजून देखील सर्रास चालू आहे. महाभारतात द्रौपदीने 5 नवरे केले तर तिला वेश्यां ठरवले गेले ते पण भर दरबारात.
अजून देखील काही धर्मांमध्ये आपला नवरा अजून बायका आणेल ही गोष्ट सहज मानली आहे ,
कारण अन्याय हा पेशीपेशित भिनलेला आहे. स्वीकारला गेलेला आहे.
आणि जेव्हा याच्या विरूध्द काही घडते मग मात्र पुरुष समाज बिथरतो. धर्म बिठरतों.
मग ते सावित्री बाई फुले, रमा रानडे यांनी चालू केलेले पाहिले स्त्री शिक्षण असो किंवा तीन तलाक चा कायद्यावर बंदी आणणे असो.

वेद हे साधारण 10 एक हजार वर्षांपूर्वी किंवा त्या आधी लिहिल्याचे सांगितले जाते. वेद लिहिणे किंवा त्यांची रचना करणे यामध्ये मैत्रेयी, गार्गी अश्या अत्यंत विद्वान अश्या स्त्रियांचा देखील समावेश होता.
एका काळापर्यंत समाज हा मातृप्रधान अथवा स्त्रीप्रधान होता. त्या काळात पुरुषांवर अत्याचार झाले असे ऐकिवात येत नाही. कारण स्त्रीचा स्वभाव निसर्गतः आईचा असतो.
नंतर हा समाज पुरुष प्रधान झाला, सत्तेच्या आणि ताकदीच्या जोरावर.
समाज ही एक सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. परंतु ही पुरुषप्रधान संस्कृती इतकी जास्त काळ चालू राहिली आहे.
फक्त भारतातच नाही तर जवळपास सगळ्या जगात. इजिप्त च इतिहास, रोम च इतिहास , कोणत्याही धर्माचा अभ्यास करा. स्त्री ल दुय्यम दर्जा दिलेला आहे नेहमी.
महाभारत , रामायण या काळात तर स्त्री जशी वागवली गेली तशीच किंवा त्याहून जास्त वाईट रित्या 1960 ते 70 पर्यंत परिस्थिती होती.

आत्ता आत्ता जाऊन गोष्टी हळू हळू बदलत चालल्या आहेत. आणि आता अजून खूप बदलतील. “आज कालच्या मुलींना असला माज आला आहे, स्वतःला जास्त शहाण्या समजतात”. असं वाक्य खूपवेळा ऐकू येते. लोकांना नावीन्य स्वीकारायला वेळ लागतो. दोन्ही बाजूच्या लोकांना, जे स्वतः बदलत असतात त्यांना देखील व जे बदल बघत असतात त्यांना देखील. ज्या स्त्रियांना गेली हजारो वर्षे घरात डांबून , नाही नाही ते धार्मिक अन सामाजिक नियम घालून त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे त्याचे अजून काय परिणाम असणार?
कोणतीही गोष्ट अत्यंतिक प्रेशर खाली दाबून ठेवली आणि प्रेशर काढले की ती गोष्ट उसळी मारणारच. ही नॉर्मल होण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी आहे.

आज करोडो स्त्रिया नोकरी करतायत. स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.
अजून खूप काही बदल होणे अपेक्षित आहेत. सामाजिक आणि धार्मिक स्तरांवर. स्त्री किंवा मादी या बद्दल माझ्या मनात खूप काही शंका देखील आहेत. पण आज ते विचारायची वेळ नाही नंतर कधीतरी.
पण तरीदेखील माझे प्रामाणिक मत हेच आहे. स्त्री ही अत्यंत खंबीर, कणखर आणि मानसिक दृष्ट्या पुरुषापेक्षा जबरदस्त ताकदवान अशी आहे. स्त्री ही बायको बहीण मैत्रीण काहीही असली तरी ती निसर्गतः आईच असते. प्रत्येकाची. आश्या प्रत्येक स्त्रीला ज्यांना मी ओळखतो किंवा ओळखत नाही त्यांना, आजच्या जागतिक स्त्री दिनी माझे अत्यंत आदरपूर्वक व भावपूर्ण नमन.

The lone wolf …

#womensday Indian Women – भारतीय महिलाएं Marathi Communities MarathiBlogs.co.in (मराठी ब्लॉग) Marathibloggers

For Facebook read below….

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2572941289394875&id=100000370884608

Author: Lone Wolf

First of all thanks to whole internet and WordPress who allowed me to communicate with millions of people... I am just a normal human being trying to learn new things in life. I love photography, thinking, philosophy and sharing it in simple words as possible. I would like to share my some work over here through my words and photos. Your comments, suggestions and critiques are most welcome. Regards Mayur

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started