What is Brahmin? ब्राह्मण म्हणजे काय?

ब्राह्मण म्हणजे काय? 

हे फक्त अश्या लोकांनी वाचावे ज्यांना खरोखर खूप खोल वर विचार करता येणे शक्य आहे. 

आज माझ्या सर्टिफिकेट वर ब्राह्मण हा शिक्का आहे. मला पण लहानपणी वाटायचे की ब्राह्मण आहोत आपण. आणि अभिमान देखील होता. तसेच प्रत्येक माणसाला त्याच्या जातीचा अभिमान असणे साहजिक आहे. आता जातीं मध्ये देखील खूप पोट प्रकार आहेत. ते सध्या बाजूस ठेवू. 

मी मोठा होत गेलो तसे स्वतः विचार करू लागलो, की नक्की काय आहोत आपण. पुस्तके वाचत गेलो त्यातून निरनिराळी मते वाचली. मी माझे मत हळूहळू बनवायला लागलो. विचार करून 

मुळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे प्रकार का आले? त्याचे अर्थ काय? 

मला बाकीचे माहीत नाही पण ब्राह्मण या शब्द बद्दल मे बोलू शकतो. करण हा शब्द मला जन्मापासून चिकटवलेला आहे. आणि हा शब्द खूपदा वाचनात देखील आला 

मी या शब्दाचा मला समजला अर्थ मांडायचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी खलील काही गोष्टी समजून घेणे फार महत्वाचे आहे 

वेद उपनिषद यांमध्ये ब्रह्मन् हा शब्द खूपदा आलेला आहे. मुखत: अद्वैत वेदांत आणि मांडुक उपनिषद हे ब्रह्मन् हा शब्द खूप वेळा वापरते. ब्रह्मन् या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष ब्रह्म किंवा परमेश्वर याला उद्देशून वापरला आहे संतांनी सोप्या शब्दात परमेश्वर किंवा मी समजवायचा प्रयत्न केला.असे सांगून की परमेश्वर चराचरात आहे.आपण जर खोलात जाऊन वेदांत काय सांगतो हे पाहू. आपण आजचा समाज बुद्धिजीवी आहोत 

खाली दिलेली अद्वैत वेदांत ने सांगितलेलीमीची व्याख्या नीट वाचा. फार confusing आहे ती

मी स्वतः जो या देहात बसलेला आहे. जो हा देह चालवतो. पण मी म्हणजे कोण? 

जो हा देह नाही. मन नाही, बुद्धी नाही, काहीच नाही असे पण नाही. असा असलेला जो कोणी आहे तो म्हणजे खरा मी 

ते तत्व सगळ्यांच्यात आणि सगळ्या चराचारात आहे तेच. पण हा मी कोणालाच समजत नाही आणि जाणून देखील घेता येत नाही

कारण ज्याला आपण physically experience करू शकत नाही ते आपण कसे मानणार?

जी गोष्ट आपले मन देखील नाही त्याला कसे imagine करणार?

जी गोष्ट आपली बुद्धी देखील नाही त्या बद्दलचे ज्ञान कसे मिळवणार? 

कोणी म्हणेल मग हामीअसे काही असतो का खरोखर 

हो असतो. कारण आपल्याला ही जाणीव असते की मी आहे. माझा हात तुटला किंवा पाय तुटला तर आपण काय म्हणू? की माझा हात तुटला. म्हणजे जोपर्यंत तो हात या शरीराला जोडून होता तोपर्यंत मे त्याला मीच समजत होतो. आता तो बाजूला आहे म्हणजे मी त्याला माझा हात असे म्हणतोय. म्हणजेच तो हात म्हणजे मी नव्हे

आत्ता पर्यंत मे जो शर्ट घातला होता तोपर्यंत मी त्या शर्टाला पकडून मी असा स्वतःचा उल्लेख करतो. पण जेव्हा मी शर्ट काढून बाजूला ठेवतो तेव्हा तो शर्ट वेगळा आणि मी वेगळा हे मला कळते. तसेच शरीर मन बुद्धी एक एक बाजूला करत जायला माणूस शिकेल तसे त्याला हे कळत  जाते की मी म्हणजे शरीर नव्हे, मन नव्हे आणि बुद्धी देखील नाही. 

मी आपण सतत अनुभवत असतोच.उदाहरण द्येयचे झाले तर अगदी छान उदाहरण आहे माझ्याकडे मे स्वतः तयार केलेले

आपण आपल्या डोळ्यांनी सगळे जग बघतो. पण आपण स्वतःचा चेहरा कधीही आयुष्यात प्रत्यक्ष बघू शकत नाही. मीप्रत्यक्षहा शब्द वापरला आहे हे लक्षात घ्या. मी माझा चेहरा कधीच पाहू शकत नाही. हो आरसा किंवा काही गोष्टीत आपण आपल्या चेहऱ्याचे प्रतिबिंब बघतो. पण ते प्रतिबिंब असते. प्रत्यक्ष मी नसतो. जसा आरसा असेल तसे ते प्रतिबिंब दिसेल. पण स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचा चेहरा बघणे शक्यच नाहीये. म्हणजेच स्वतःला direct आपण कधीच बघू शकणार नाही 

पण याचा अर्थ असा आहे का की मला चेहरा नाहीच आहे? आपल्याला चेहरा आहे याची जाणीव आपल्याला 100 टक्के असते. पण आपण तो बघू शकत नाही. Exactly तसेचमीजो कोणी आहे त्याचे वर्णन करता येईल. की तो  “मीआहे हि जाणीव आपल्याला 24 तास असते. पण जागे असताना आपण स्वतःच्या शरीराला आपण मी असे समजतो. झोपलेले असताना स्वतःच्या स्वप्नात जो कोणी असतो म्हणजेच मनाला मी असे समजतो. तर गाढ झोपेमध्ये ज्याला deep sleep म्हणतात तेथे तर काहीही नसून देखील मी हा असतोच.

जसे मला चेहरा बघता येत नसताना देखील हा दृढ विश्वास असतो, ही जाणीव असते की मला चेहरा आहे. फक्त मे तो पाहू शकत नहीये पण मला जाणीव आणि खात्री आहे की मला चेहरा आहे.

 तीच जाणीवमीची असते. तो हा दिसणारा , जाणवणारा मी म्हणजे ब्रह्मन्. त्याची जाणीव ज्या व्यक्तीला सतत असते त्याला हे देखील कळलेले असते की हाच मी सर्वत्र आहे. 24 तास ही जाणीव असणे हेच खरे आत्मज्ञान. आणि ते मिळवणारा खरा ब्राह्मण. 

तर या मी ला जाणून घेणेअहंब्राह्मस्मि किंवा तत्वामसी किंवा सोSहम म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्म (ब्रह्मन्) आणि परमेश्वर मीच आहे. हे ओळखणे या मार्गावर चालणाऱ्या माणसाला ब्राह्मण म्हंटले जाते 

परमेश्वर किंवा स्वत्व याचा साक्षात्कार होण्यासाठी देव देवता यज्ञ याग जात धर्म याची खर तर कसलीच गरज नसते. तर स्वतःचे आकलन करत जाणे याची गरज असते. नास्तिकातला नास्तिक देखील ते मिळवू शकतो असेच मांडुकोपनिषद सांगते. 

आणि यासाठी देवाला मानले पाहिजे असेही नाहीये ही याची खासियत आहे. खास करून नास्तिक लोकांचा विचारच यात केला गेला आहे. स्वतःची ओळख करून घेणे हे महत्वाचे, देव माना अथवा मानू नका. पण स्वरूप अनुभवा. हेच अद्वैत वेदांत सांगतो. 

तर अश्या प्रकारे ब्रह्मन् ची ओळख करून घेणारा ब्राह्मण असतो. जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही 

मी स्वतःला ब्राह्मण मानत नाही आणि फक्त माणूस अशी जात मला लिहिता येत नाही ते सुद्धा कायद्याच्या कमतरतेमुळे 

ज्या दिवशी मी त्या रस्त्यावर असेन जेथे मलामीकाय ते ओळखायचं त्या दिवशी मी ब्राह्मण असेन. आणि ते देखील मला ब्राह्मण बोलणारे हे लोक असतील कारण मला स्वतःला त्या गोष्टी बद्दल ना आस्था असेल ना महत्व की मला काय म्हणून ओळ्खतायत. 

माझ्या मते आणि वेदांतच्या मते देखील संत ज्ञानेश्वर, तुकाराम , नामदेव, स्वामी विवेकानंद , बुद्धकबीर, रुमी, सुलतान बहू, राम, कृष्ण, बुल्लह शाह हे खरे ब्राह्मण. आपण त्यांना केवळ ते कोणत्या जातीत जन्माला आले त्या जातीवरून ओळखायचं बघतो. 

जो कोणीही माणूस म्हणून जन्माला आला आणि ज्याने कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा कोणत्याही मार्गाने स्वतःला जाणून घ्येयला प्रयत्न केलेला असा  प्रत्येक जण ब्राह्मण आहे

त्यामुळेच विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय असून, वाल्या कोळी हा इतर जातीचा असून, त्यांना ब्राह्मण हे पद मिळाले. 

केवळ ब्राह्मण आडनाव असलेल्या घरात जन्माला आलेला कधीच ब्राह्मण नसतो. केवळ व्यर्थ अभिमान असतो. 

प्रत्येकाने जर खरच प्रामाणिक प्रयत्न केला तर atleast आपण खरच काय आहोत याची जाणीव तरी होईल. अगदीच काही नाही तर खोटे अहंकार गळून पडतील. 

मी आत्ता तरी केवळ एक माणूस आहे. आणि जवळपास आजूबाजूला असलेले सगळे जण. पण कधीतरी ब्राह्मण बनेन आणि प्रत्येकाचा स्वतःला या level जा जाणे हा मूलभूत अधिकार आहे. कारण प्रत्येकात तोच ब्रह्मन् निवास करतो, तेच तत्व निवास करते. ज्या प्रमाणे घरातील इलेक्ट्रिसिटी ही एकच असते पण ती दृश्यमान होते ती कधी बल्ब च्या रुपात म्हणजे प्रकाशाच्या रुपात, कधी फॅन च्या रुपात म्हणजे हवेच्या रुपात आणि कधी हीट च्या रुपात. पण सगळ्यामध्ये तीच electricity तोच करंट खेळत असतो. अगदी तसेच आहे सगळे आपण पण.

आणि एकदा ही जाणीव झाली की मीच सगळे आहे तर मी कसा कोणाचा द्वेष करू शकेन, कसे कोणाचे वाईट करू शकेन? 

मला आशा आहे मी प्रयत्न केलाय जास्तीत जास्त सोपे लिहायचा. काही लिहिन्यातल्या त्रुटींमुळे समजले नसल्यास माफी असावी.

 Mayur The Lone Wolf

Author: Lone Wolf

First of all thanks to whole internet and WordPress who allowed me to communicate with millions of people... I am just a normal human being trying to learn new things in life. I love photography, thinking, philosophy and sharing it in simple words as possible. I would like to share my some work over here through my words and photos. Your comments, suggestions and critiques are most welcome. Regards Mayur

One thought on “What is Brahmin? ब्राह्मण म्हणजे काय?”

Leave a reply to सर्वेश जोशी Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started